Google ads

Ads Area

मराठी व्याकरण क्रियविशेषण अव्यय | marathi grammar kriyavisheshan avyay

 मराठी व्याकरण क्रियविशेषण अव्यय | marathi grammar kriyavisheshan  avyay

मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय
मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय


क्रियाविशेषण अव्यय माहिती ( toc)
क्रिया

वाक्यात लिंग वचन विभक्ती यामुळे कोणताही बदल होतो तेव्हा त्यास अविकारी शब्द किंवा अव्यय असे म्हणतात.

अविकारी शब्दांचे चार प्रकार पडतात त्यापैकी त्यापैकी आपण क्रियाविशेषण अव्यय या घटकाचा अभ्यास करणार आहोत .स्पर्धा परीक्षासाठी एमपीएससी, तलाठी भरती ,पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षामध्ये मराठी असेल त्या ठिकाणी व्याकरण हे असतेच त्यामध्ये आपणाला प्रत्येक घटकाचा अभ्यास हा करायचा असतो. त्यामुळे आपले व्याकरण हे पक्के होऊन आपले गुण जाणार नाहीत यासाठी आपण सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे .sampurnamarathi या site वर तुम्हाला सगळे व्याकरण घटक अभ्यासासाठी उपयोगी पडतील .


क्रियाविशेषण अव्यय | kriyavisheshan avyay

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्रिया केव्हा ,कोठे,किती वेळ, किती प्रमाणात घडलेली आहे याची माहिती या क्रियाविशेषण अव्यय यातून आपणास मिळते. काही शब्द ही क्रियाविशेषणे अविकारी असतात तर काही विकारी असतात.

क्रियविशेषण             क्रियविशेषणअव्यय


क्रियाविशेषण

 कर्त्याचे लिंग, वचन, पुरुषानुसार बदल होतो त्यास  क्रियविशेषण म्हणतात .

उदा . तो चांगला खेळतो 

       ती चांगली खेळते 

       ते चांगले खेळतात

        तू चांगला खेळतोस


क्रियाविशेषण अव्यय

क्रियाविशेषण अव्यय हे कर्त्याचे लिंगा, वचन ,पुरुषानुसार बदलत नाही.

उदा . तो हळू चालतो 

       ती हळू चालते 

        ते हळू चालतात

        तू हळू चालतोस


वरील उदाहरणावरून आपणास असे लक्षात येते की क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय या दोन्हीमध्ये वाक्यात कर्त्याचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदल होतो आणि बदल होत नाही हे आपणास उदाहरणावरून समजले.


क्रियाविशेषण अव्ययाची दोन गटात विभागणी होते.

अ ) अर्थावरून पडणारे प्रकार

ब ) स्वरूपावरून पडणारे प्रकार


अ ) अर्धावरुन पडणारे प्रकार

1 ) कालवाचक 

                 - कालदर्शक 

                  - सातत्य दर्शक

                  - आवृत्ती दर्शक

2) स्थान वाचक 

           - स्थितीदर्शक 

           - गती दर्शक

3) रिती वाचक

        -   प्रत्यय दर्शक 

         -  अनुकरण दर्शक 

         -  निश्चय दर्शक

4) परिणाम वाचक

5) प्रश्नार्थक

6) निषेधार्थक


आ) स्वरूपावरून पडणारे प्रकार

1) सिद्ध क्रियाविशेषण अव्यय

2 ) साधित क्रियाविशेषण अव्यय

           अ) प्रत्ययसाधित

            ब) सामासिक

असे क्रियाविशेषण अव्यय याची दोन गटात विभागणी होऊन त्याचे आठ प्रकार आहेत त्याचे आपण या आठ प्रकारचे आपणास सविस्तर उदाहरणासहित माहिती करणार आहोत.


1 ) कालवाचक क्रिया विशेषण अव्यय

  अ ) कालदर्शक ( क्षण वाचक ):

ह्या प्रकारात क्रिया केव्हा घडली हे दाखवले जाते हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषण अव्यय यांना कालदर्शक क्रियविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा .आधी,आता, सध्या ,तूर्त ,हल्ली, सांप्रत, उद्या ,परवा ,लगेच, जेव्हा,-जेव्हा, पूर्वी ,मागे ,रात्री ,दिवसा, अवकाळी, येरवाळी

ब) आवृत्ती दर्शक

एखाद्या घटनेची पुनरावृत्ती दाखवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक शब्द असे म्हणतात

उदा . फिरुन,वारंवार, दररोज, पुन्हापुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी

क ) सातत्य दर्शक

एखादी घटना अखंड चालत असेल किंवा अखंड क्रिया दर्शवणारे कालवाचक शब्दांना सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा .नित्य ,सदा ,सर्वदा, आज-काल ,सर्वकाल, हमेशा,  नेहमी


2) स्थलवाचक क्रियविशेषण अव्यय

क्रियेचे स्थल किंवा एखादे ठिकाण दर्शविणाऱ्या  शब्दांना स्थलवाचक क्रियविशेषण अव्यय म्हणतात .

एखादी घटना कधी केव्हा कशी घडली हे सांगणे महत्वाचे आहे असे आपणास समजणे महत्त्वाचे आहे.

अ) स्थितीदर्शक : यामध्ये क्रियेची स्थिती दाखवली जाते .

उदा.येथे,,तेथे,जेथे ,वर ,खाली,कोठे ,मध्ये ,अलीकडे ,पलीकडे ,मागे ,पुढे ,जिकडे ,तिकडे ,सभोवार 

     -  बैल खाली बसला

     - पलीकडे डोंगर आहे 

       -आभाळ वर आहे

ब ) गतीदर्शक : इकडून ,तिकडून ,मागून ,पुढून, वरुन, खालून ,लांब,दूर

- रस्त्यातून जाताना पुढून गाय आली 

- मुंबईला जाताना इकडून ये 

- माझ्यापासून तो खूप दूर पळाला


3 ) रितीवाचक क्रियविशेषण अव्यय

वाक्याची क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणना रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.


रितीवाचक क्रियाविशेषण अव्ययचे तीन प्रकार पडतात.

1) प्रकारदर्शक: जलद ,हळू, सावकाश ,तेवी ,जेवी ,मुद्दाम आपोआप ,फुकट, व्यर्थ ,उगीच, जसे ,कसे तसे, असे

    - जलद गाडी आहे

    - माझी बडबड फुकट गेली

    - फांदी आपोआप पडली

ब ) अनुकरण दर्शक: या अव्यययात ध्वनींची पुनरावृत्ती झालेली क्रियाविशेषण अव्यये यात मोडली जातात.

 उदा . झटकन पटपट,बदाबद,चमचम,धपाधप,वटवट,खळखळ,

- ती रागाने झटकन निघून गेली

- तो गावाच्या ओढीने पटपट चालू लागला

 - नदीचा खळखळ आवाज येत होता

क) निश्चय दर्शक: 

उदा .खचित ,खरोखर ,नक्की, खुशाल, निखालस

- त्याने बोलल्याप्रमाणे खरोखरच ती गोष्ट केली

- तू खुशाल गावाला जा


4) परिमाणवाचक (संख्यावाचक)

क्रियाविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी क्रियाविशेषण हे संख्यावाचक किंवा परिमानवाचक अव्यय असतात.

1) संख्यावाचक : पहिला ,दुसरा ,धंदा, चौपट ,दहापट

2)अधिक्यवाचक : अधिक, फार ,अतिशय, पुष्कळ

3)पर्याप्तीवाचक : पुरेसा, बरोबर, बस ,पुरे ,बेताचा

4)श्रेणीवाचक : क्रमाने ,क्रमश: 


काही परिमाणवाचक शब्द 

उदा . कमी ,जास्त ,किंचित, जरा, काहीसा, थोडा ,क्वचित, अत्यंत, अगदी ,बिलकुल ,मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इ.

- तो मुळीच येणार नाही 

- त्याच्यात किंचितही बदल झाला  नाही

5 ) प्रश्नार्थक 

का ,ना ,केव्हा, कोठे,कसे या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला तर ती प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय  होतात.

- आमच्या घरी जेवायला येशील का 

- केव्हा जाणार आहे तू 


6) निषेधार्थक

न/ ना चा वापर नकार किंवा विरोध दर्शवण्यासाठी केला जातो.

- तू न खाल्लेले बरे.

- त्याने खरे सांगितले तर ना !


आ ) स्वरुपावरून पडणारे प्रकार

1 ) सिद्ध क्रियाविशेषण अव्यय:

 मूळ क्रियाविशेषण यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात 

उदा .मागे,पुढे, येते ,तेथे ,आज

उदा . तो मागे गेला

       तो पुढे पळला


2 ) साधीत क्रियाविशेषण अव्यय

नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम, शब्दयोगी,अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या या क्रियाविशेषांना  साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

याची दोन गटात विभागणी होते

अ ) प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय

 1) नामसाधित: रात्री ,दिवसा,सकाळी ,व्यक्तिशः,वस्तुतः

2 ) विशेषण साधित : एकत्र, मोठ्याने, चांगला, सर्वत्र

3 ) सर्वनाम साधित : त्यामुळे ,हतावरून,कित्येकदा

4) धातुसाधित:  खाताना ,रडताना,खेळताना

5 ) अव्ययसाधित :कोठून,इकडून,खालून,


 - तो रात्री आला ( नाम साधित )

-  त्याला त्यामुळे मारले ( सर्वनाम साधी)

-  त्याने सर्व रडून सांगितले ( धातुसाधित )

 - पाणी खालून वाहते ( अव्ययसाधित )

- तो मोठ्याने ओरडला ( विशेषण साधित)

ब ) सामासिक

द्विरुक्त किंवा सामासिक शब्द काही वेळा क्रियाविशेषणाचे कार्य करतात

उदा . अजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगाव, हरघडी, गैरहजर

- आज राहुल शाळेत गैरहजर आहे

- सशाच्या शोधात ते गावोगाव फिरले

- मंदिर दररोज उघडले जाते


प्रश्नावली

1 ) खालील शब्दाचा प्रकार ओळखा

  ' येरवाळी '

नाम ,क्रियाविशेषण ,क्रियापद , विशेषण

2) बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

वर, बाण ,खालून ,गेला

3) एकदा, दोनदा, तीनदा ,हजारदा ही क्रियविशेषणे आहेत

स्थिती वाचक, आवृत्ती वाचक, सातत्य वाचक, गती वाचक

4) " माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली" प्रकार ओळखा.

कालवाचक क्रियाविशेषण ,स्थल वाचक क्रियाविशेषण, परिमाणवाचक विशेषण, रितीवाचक क्रियाविशेषण

5 )" यंदा अधिक पैसा मिळेल"  प्रकार ओळखा .

स्थलवाचक, रीतिवाचक ,कालवाचक, संख्यावाचक

6) " तू हळूच बोल जरा " प्रकार कोणता .

परिमाणवाचक, स्थलवाचक, कालवाचक, रितीवाचक 

7) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा

खालून ,आपोआप, क्षणोक्षण, अतिशय

8) सिद्ध क्रिया विशेषण असलेले वाक्य कोणते

त्यामुळे त्यांचे येणे झाले नाही ,तो दिवसाचा चालतो, आज त्यांची मोठी सभा झाली ,तो मोठ्याने हसला

9) "वाहने सावकाश चालवा "  प्रकार ओळखा.

विशेषण, उभयान्वयी अव्यय, सामान्यनाम ,क्रियाविशेषण

10) "चोर माझ्यासमोरुन गेला "प्रकार ओळखा.

 रीतिवाचक ,परिमाणवाचक, कालवाचक, स्थलवाचन

आपण या घटकात विकारी शब्दाचे क्रियाविशेषण अव्यय हा घटक अभ्यासला .स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे तसेच पुढील पोस्टमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी असणारे घटक तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे असणार आहेत .


पुढील घटक अभ्यासा

समास आणि त्याचे प्रकारटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area